प्रसिद्धी पत्रक

१९ - डिसेंबर - २०१८
वीजचोरी दंडाची आकारणी कमी करण्याकरिता औरंगाबाद महावितरण कंपनीच्या अति. कार्यकारी अभियंता भरारी पथकाच्या अधिकाऱ्याने रुपये २०,०००/- लाचेची मागणी केली म्हणून त्यांचे विरुद्ध लाच मागणी गुन्हा नोंद करण्यात आला.

१९ - डिसेंबर - २०१८
वन परिक्षेत्र कार्यालय आष्टी येथील वन रक्षक यांनी लाकूड वाहतुकीचा ट्रॅक्टर चालू ठेवण्यासाठी रु . १५००/- लाचेची मागणी करून स्विकारले असता एसीबीने त्यांना रंगेहात पकडले.

१७ - डिसेंबर - २०१८
प्रॉक्लमेशन वॉरंटची बजावणी करू नये म्हणून चित्तरंजन पार्क, पोलीस स्टेशन, सेंट्रल प्रोसेसिंग सर्विस पूल नवी दिल्ली येथील सहा. पोलीस उप निरीक्षक यांनी रु. २५,०००/- लाच घेतली असता एसीबीने त्यांना रंगेहात पकडले.

१४ - डिसेंबर - २०१८
राजवर्धन पाटील मुलांचे बालग्रह, पारे ता. खानापूर, जि. सांगली च्या अध्यक्षांनी त्यांच्या संस्थेची तपासणी करणाऱ्या महिला व बाल विकास कार्यालयाच्या अधिकारी यांना अनुकूल तपासनी अहवाल देण्याकरिता रु.१,९८,०००/- चे प्रलोभन दिले म्हणून एसीबीने त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला

१३ - डिसेंबर - २०१८
धर्माबाद, जि. नांदेड येथिल तालुका कृषी कार्यालयाच्या कृषी सहाय्यकाने शेतीसाठी शेडनेटचा प्रस्ताव ज़िल्हा अधीक्षक यांना पाठविणेकरीता रु. २,५००/- लाच घेतली असता एसीबीने त्यांना रंगेहात पकडले.

