प्रसिद्धी पत्रक

०८ - जानेवारी - २०१९
पालघर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षण अधिकारी यांनी एका खाजगी शिक्षण संस्थेच्या शिक्षकाच्या पदास मंजुरी देण्याकरिता त्याच्याकडे रु. 2 लाख लाचेची मागणी करून त्यापैकी रु. १ लाख लाच स्वीकारली असता एसीबीने त्यांना रंगेहात पकडले.

०७ - जानेवारी - २०१९
आधारवाडी कारागृह, कल्याण, ठाणे येथील तुरुंग अधिकारी यांनी बंदी आरोपी मुलास त्रास न देण्याकरिता खाजगी इसमाकरवी रु. १०,०००/- लाच घेतली असता एसीबीने त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला.

०७ - जानेवारी - २०१९
शिवाजीनगर पोलीस ठाणे , बीड येथील पोलीस हवालदाराने दाखल गुन्ह्यात आरोपीला मदत होण्याच्या अनुषंगाने तपास करण्याकरिता रु. १०,०००/- लाच घेतली असता एसीबीने त्यांस रंगेहाथ पकडले.

०५ - जानेवारी - २०१९
दाखल गुन्ह्यातील आरोपीला मदत करण्याकरिता यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक व पोलीस नाईक यांनी रु. २० लाखाची मागणी करून त्यापैकी रु. ५ लाख लाच स्वीकारली असता एसीबीने त्यांना रंगेहात पकडले.

०४ - जानेवारी - २०१९
नेवरेगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद येथील पोलीस पाटील यांनी त्यांच्या गावातून वाळू वाहतूक करू देण्यासाठी वाळू वाहतुकदारकडे रु. १०,०००/- हफ्ता म्हणून लाचेची मागणी करून त्यापैकी रु. ५०००/- स्वीकारले असता एसीबीने त्यांना रंगेहात पकडले.

