प्रसिद्धी पत्रक

परिक्षेत्र*
घटक कार्यालये*

१३ - डिसेंबर - २०१८

ग्रामविकास अधिकारी मरकड, ग्राम पंचायत कार्यालय बुरडगाव, ता.अहमदनगर, जि.अहमदनगर यांनी जन्माची नोंद लावण्यासाठी ४,०००/- रु. लाच घेतली असता एसीबीने त्यांना रंगेहात पकडले.

१३ - डिसेंबर - २०१८

आरोग्य विभागात आरोग्य सेवक पदावर नोकरी लावुन देण्यासाठी आरोग्य उपकेंद्र बोरगाव, सारणी, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद येथिल आरोग्य सेविका श्रीमती. चंडोल यांनी रु. २५,०००/- लाच स्विकारली असता एसीबी ने त्यांना रंगेहात पकडले.

१३ - डिसेंबर - २०१८

लेखा शाखा, नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय येथील लिपिक श्रीमती. खोब्रागडे यांनी एम.पी.के.वाय. आरोग्य योजना मुंबई येथुन मंजूर होऊन आलेले वैद्यकीय बिल ट्रेझरी मध्ये पाठविण्याकरीता रु. ८,०००/- लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झालेने त्यांचे विरुद्ध एसीबीतर्फे गुन्हा दाखल.

१३ - डिसेंबर - २०१८

सिटी सर्वे क्रमांकाचे टिपण, टोच नकाशा व चौकशी उताऱ्याची नक्कल देण्यासाठी उप अधीक्षक भूमी कार्यालय, कळंब येथिल अभिलेखपाल कवडे व शिपाई वाघमारे यांनी २०० रु. लाचेची मागणी करून लोकसेवक वाघमारे यांनी ती स्विकारली असता एसीबी ने त्यांना रंगेहात पकडले.

१३ - डिसेंबर - २०१८

वडीलोपार्जित प्राप्त जमिनीच्या नोंदी मंजूर करून त्या नोंदी ७/१२ उताऱ्यावर घेण्याकरीता थेऊर, पुणे येथील मंडल अधिकारी यांनी खाजगी इसमामार्फत रु. १५,०००/- लाचेची रक्कम स्विकारली असता एसीबी ने त्यांना रंगेहात पकडले.