प्रसिद्धी पत्रक

२९ - डिसेंबर - २०१८
अपघात प्रकरणात कारवाई न करता प्रकरण मिटवण्यासाठी घारगाव पोलीस ठाणे, जि. अहमदनगर येथिल पोलीस हवालदार यांनी रु. ८,०००/- लाचेची मागणी करून त्यापैकी रु. ४,०००/- लाच रक्कम स्विकारली म्हणुन एसीबीतर्फे गुन्हा नोंद.

२९ - डिसेंबर - २०१८
तलाठी सज्जा हरडफ, ता. हदगाव, जि. नांदेड यांनी वारसा हक्काने जमीनीचे फेरफार करून देण्यासाठी रु. ४,५००/- लाचेची मागणी करून ती स्विकारली असता एसीबीने त्यांना रंगेहात पकडले.

२८ - डिसेंबर - २०१८
मानेरे चिंचपाडा येथिल अनधिकृत बांधलेल्या चाळींवर कारवाई न करण्यासाठी प्रभागक्षेत्र अधिकारी, आय वॉर्ड, क.डों.म.पा. यांनी रु. ८०,०००/- लाचेची मागणी करून त्यापैकी रु. २५,०००/- पहिला हफ्ता म्हणुन घेतले असता एसीबी ने त्यांना रंगेहात पकडले.

२७ - डिसेंबर - २०१८
खरेदी केलेल्या जमिनीची नोंद करण्यासाठी कर्जत, जि.रायगड येथील तलाठी यांनी रु. ५,०००/- लाच घेतली असता ऐसीबी त्यांना रंगेहात पकडले.

१९ - डिसेंबर - २०१८
रेशीम उद्योगासाठी लागवड केलेल्या तुतीचे व कीटक पालनासाठी उभारलेल्या शेडचे अनुदान मिळण्यासाठी फाईल मंजूर करण्यासाठी बीड रेशीम कार्यालयाच्या क्षेत्र सहायक अधिकारी यांनी रु. ८०००/- लाचेची मागणी केली म्हणून त्यांचे विरुद्ध लाच मागणी गुन्हा नोंद करण्यात आला.

