प्रसिद्धी पत्रक

०४ - जानेवारी - २०१९
शेतजमीन खातेफोड करून नवीन ७/१२ देण्याकरिता बीड जिल्यातील सजा वाहिरा ता. आष्टी च्या तलाठी यांनी खाजगी इसमाच्या मदतीने रु. ३०००/- लाच घेतली म्हणून एसीबीने त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला.

०३ - जानेवारी - २०१९
सातबारा पत्रकी नोंद घेऊन त्याची प्रत देण्याकरिता जि. औरंगाबाद, सजा कन्नडच्या तलाठी यांना रु १०,०००/- लाच घेताना एसीबीने रांगेहात पकडले.

०१ - जानेवारी - २०१९
कर्जत नगरपालिकेचे दोन लिपिक मालमत्ता करावरील दंड रक्कम कमी करून देणेसाठी तक्रारदाराकडुन १३५०० रु. ची लाच घेताना एसीबी कडून अटक.

३१ - डिसेंबर - २०१८
तलाठी सज्जा राहाटी, ता. भोकर, जि. नांदेड यांनी फेरफार करून सातबारावर नोंद घेण्यासाठी रु. ४,०००/- लाचेची मागणी करून तडजोडीअंती रु. ३,०००/- लाच मागणी केल्याचे निष्पन्न झालेने त्यांचेविरुद्ध लाच मागणी गुन्हा नोंद.

२९ - डिसेंबर - २०१८
मुंबई नाका पोलीस ठाणे, नाशिक शहर येथिल सहाय्य्क पोलीस निरीक्षक यांनी पोलीस ठाणेस प्राप्त तक्रार अर्जावर कारवाई न करणेकरीता लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झालेने त्यांचेविरुद्ध एसीबीतर्फे लाच मागणी गुन्हा नोंद.

