प्रसिद्धी पत्रक

०७ - डिसेंबर - २०१८
डोंबिवली पोलीस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षकाने खाजगी व्यक्तींच्या मदतीने रु.१,००,०००/- लाच घेतली म्हणून त्यांच्याविरुद्ध ऐसीबीतर्फे गुन्हा नोंद करण्यात आला.

०६ - डिसेंबर - २०१८
प्लॉटचा फेर मंजुर करून ८ अ चा उतारा देण्यासाठी भिकार सारोळा ग्रामपंचायत ता. उस्मानाबाद जि. औरंगाबादच्या ग्रामसेवक यांनि रु. १०००/- लाच घेतली असता एसीबीने त्यांना रंगेहात पकडले.

०६ - डिसेंबर - २०१८
रत्नागिरी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता व उप अभियंता यांनी ग्रामपंचायत हद्दीतील पाखाडी कामाचे बिल मंजूर करण्याकरिता रु. ५०००/- लाच घेतली असता त्यांना एसीबीने रंगेहात पकडले.

०५ - डिसेंबर - २०१८
चंद्रपूर जिल्ह्यातील ता. सावळी, वह्याळ बुर्क ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने ग्रामपंचायत भवनाच्या बांधकामाचे बिल मंजूर करवुन घेऊन चेक दिल्याचा मोबदला म्हणून रु.३५००/- लाच घेतली असता एसीबीने त्यांना रंगेहात पकडले.

०४ - डिसेंबर - २०१८
जमिनीच्या दस्ताची नोंद घेण्याकरिता उस्मानाबादच्या , कलंब दुय्यम निबंधक कार्यालयाच्या दुय्यम निबंधकास रु. ४५००/- लाच घेताना एसीबीने रांगेहात पकडले.

