प्रसिद्धी पत्रक

परिक्षेत्र*
घटक कार्यालये*

१६ - जानेवारी - २०१९

मालेगाव पोलीस ठाणे, नाशिक ग्रामीणचे सहायक पोलीस निरीक्षक यांना रु. १०,०००/- लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले.

१२ - जानेवारी - २०१९

शामराव शेटे प्रादेशिक परिवहन अधिकारी, अंधेरी मुंबई यांनी त्यांचे पदाचा दूरपयोग करून त्यांचे ज्ञात स्रोतापेक्षा ७०. ९१% इतकी अधिक अपसंपत्ती जमा केली म्हणून त्यांचेविरुद्ध व त्यांचे पत्नी विरुद्ध एसीबीतर्फे गुन्हा नोंद करण्यात आला.

११ - जानेवारी - २०१९

वनपाल, वन परिक्षेत्र कार्यालय इस्लापूर, ता. किनवट, जि. नांदेड यांनी वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसान भरपाईचे बिल मंजूर करण्यासाठी रु. ६,०००/- लाच घेतली असता ऐसीबी त्यांना रंगेहात पकडले.

०९ - जानेवारी - २०१९

मुंबई, म्हाडा कार्यालयाच्या विभागीय लेखापाल याने नामंजूर निविदेची अनामत रक्कम परत देण्यासाठी रु. २०००/- लाच घेतली असता एसीबीने त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला.

०९ - जानेवारी - २०१९

जिल्हा रेशीम कार्यालय, उस्मानाबादच्या तांत्रिक सहायकाने कुशल बिल काढण्याकरिता रु.८०००/- लाचेची मागणी करून त्यापैकी रु. ४५००/- लाच घेतली असता एसीबीने त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला.