प्रसिद्धी पत्रक

२९ - नोव्हेंबर - २०१८
दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी कासा पोलीस ठाणे, जि. पालघरच्या पोलीस उप निरीक्षक अधिकाऱ्याने रु. २,००,०००/- लाचेची मागणी करून त्यापैकी रु. ७५,०००/- पहिला हफ्ता म्हणून घेतले असता एसीबीने त्यांना रंगेहात पकडले.

२८ - नोव्हेंबर - २०१८
शेतीसाठी वीज कनेक्शन देण्यासाठी रत्नागिरी येथिल महावितरण कंपनी, शाखा खोपीच्या शाखा अभियंत्याने रु. २५,०००/- लाच घेतली असता एसीबीने त्यांना लाच घेताना रंगेहात पकडले.

२८ - नोव्हेंबर - २०१८
ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जि. प. ठाणे या कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता प्रज्वल भोईर यांनी त्यांच्या सेवाकालात उत्पन्न स्त्रोतापेक्षा अधिक १६. २५ % अपसंपदा भ्रष्ट मार्गाने संपादित केल्याने एसीबीतर्फे त्यांचेविरुद्ध अपसंपदा गुन्हा नोंद करण्यात आला.

२८ - नोव्हेंबर - २०१८
अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्याकरीता अंबरनाथ नगर परिषदेच्या कनिष्ठ लिपीकाने रु. २०,०००/- लाचेची मागणी करून त्यापैकी रु. ५,०००/- पहिला हफ्ता म्हणून लाच घेण्याचे कबुल केले म्हणुन एसीबीतर्फे त्यांचेविरोधात गुन्हा नोंद.

२८ - नोव्हेंबर - २०१८
नाशिक शहरच्या पोलीस आयुक्त कार्यालयाच्या वरिष्ठ लिपीकाने विभागीय चौकशीचे कामात तक्रारदाराच्या बाजूने मदत करण्याकरीता रु. १५,०००/- लाच घेतली असता एसीबीने त्यांना रंगेहात पकडले.

