प्रसिद्धी पत्रक

परिक्षेत्र*
घटक कार्यालये*

०३ - नोव्हेंबर - २०१८

कराड येथिल किवळ गावच्या तलाठयाने सातबारा उतारा प्रमाणित करून देण्यासाठी रु. ५,०००/- लाच घेतली असता एसीबीने त्यांना रंगेहात पकडले.

०३ - नोव्हेंबर - २०१८

ठाणे जिल्हा को. ऑप. हौ. फेडरेशन लि. ठाणे येथील विशेष वसुली व विक्री अधिकाऱ्याने गाळा जप्तीची कारवाई थांबविण्याकरिता रु. २,०००/- लाच घेतली असता एसीबीने त्यांना रंगेहात पकडले.

०३ - नोव्हेंबर - २०१८

नाशिक जिल्यातील मालेगाव ग्रामीण उप विभागाच्या लिपिकाने लाईट बिल कमी करून देण्यासाठी रु. २०,०००/- लाचेची मागणी करून तडजोडीअंती रु. १५,०००/- लाच घेतली असता एसीबीने त्यांना रंगेहात पकडले.

०३ - नोव्हेंबर - २०१८

नांदेड जिल्यातील बिलोली निबंधक कार्यालयाच्या दुय्यम निबंधक व दस्तलेखक यांनी रु. ७,५००/- लाच घेतली असता एसीबीने त्यांना रंगेहात पकडले.

०२ - नोव्हेंबर - २०१८

सातारा रोड, कोरेगाव येथील पाडळी गावच्या तलाठयाने सातबारा उतारा प्रमाणित करून देण्यासाठी रु. २,०००/- लाचेची मागणी करून स्विकारली असता त्यांना एसीबीने रंगेहात पकडले.