प्रसिद्धी पत्रक

२७ - नोव्हेंबर - २०१८
कल्याण, नेतीवली महावितरण कार्यालयाच्या विद्युत सहायक अधिकारी यांनी विद्युत कनेक्शन लावून देण्याकरिता रु. ४०००/- लाच घेतली असता त्यांना एसीबीने रंगेहात पकडले.

२२ - नोव्हेंबर - २०१८
पोलीस ठाणे शिवाजी नगर, नांदेड येथील सपोनि. व पोलीस हवालदार यांनी तक्रारदार यांचे भावाविरुद्ध दाखल गुन्ह्यात सहाय्य करण्यासाठी लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने एसीबी तर्फे गुन्हा दाखल.

२२ - नोव्हेंबर - २०१८
शेत जमिनीबाबतचा फेरफार रद्द करण्याचा निकाल देण्यासाठी भिवंडी उपविभागीय दंडाधीकारी कार्यालयाच्या स्टेनोने रु. १४ लाख लाच घेतली असता एसीबीने त्यांना रांगेहात पकडले.

२० - नोव्हेंबर - २०१८
अहमदनगर, भूमिअभिलेख कार्यालय कोपरगाव च्या निमतनदार अधिकाऱ्याने खरेदी केलेल्या जागेच्या नावाची नोंद घेण्याकरिता रु. 2000/ लाच घेतली असता त्यांना एसीबीने रांगेहात पकडले.

२० - नोव्हेंबर - २०१८
औरंगाबाद जिल्ह्याच्या तहसीलदारांच्या चालकाने रेती व्यावसायिकाकडून त्यांचा व्यवसाय करू देण्याकरिता रु. १,५०,०००/- हफ्ता म्हणून लाच मागितली असता त्याच्याविरुद्ध लाच मागणी गुन्हा नोंद करण्यात आला.

