प्रसिद्धी पत्रक

३१ - ऑगस्ट - २०१८
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, बांधकाम विभाग, पनवेल जिल्हा- रायगड, उप विभागीय अधिकारी प्रमोद रणजितसिंग भैसे यांना ४०,०००/- रुपये लाच स्विकारताना नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले. तसेच त्यांचे विरुध्द मा. विशेष न्यायाधिश ठाणे यांचे न्यायालयात दोषारोप सादर केले असता आलोसे यांना सदर न्यायालयात आरोप सिद्ध झाल्याने मा.न्यायालयाने शिक्षा सुनावण्यात आली आहे.

३१ - ऑगस्ट - २०१८
गोपीचंद दत्तात्रय पाठारे, वय ४५ वर्षे, बिगारी (सुपरवायझर) बांधकाम विभाग पुणे महानगर पालिका यांनी २०,०००/- रुपये लाच स्विकारल्यानंतर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले.

३१ - ऑगस्ट - २०१८
राजेंद्र श्रीरंग ओव्हाळ वय ४२ वर्षे, वरिष्ठ सहायक, शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद बीड वर्ग-३, यांनी ५,०००/- रुपये लाच स्विकारल्यानंतर बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले.

३१ - ऑगस्ट - २०१८
गेनभाऊ जयवंत शेवाळे वय ५२ वर्षे , तलाठी सज्जा कदमवालीवस्ती, तालुका हवेली जिल्हा पुणे यांनी ५,०००/- रुपये लाच स्विकारल्यानंतर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले.

३१ - ऑगस्ट - २०१८
बसवराज गुंतेजी तलाठी सज्जा मिरे , जिल्हा ठाणे यांनी १,००,०००/- रुपये लाच स्विकारल्यानंतर ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले.

